ब्लॉग विषयी थोडेसे.....


नमस्कार ,

            आपण तारांगण या youtube चॅनलला दिलेला प्रतिसाद खरंच वाखाणण्याजोगा होता. आपण केलेल्या मार्गदर्शना बद्दल मी आपला शतशः आभारी आहे. आपण केलेल्या मागणी, मार्गदर्शन व सूचना यांचे तंतोतंत पालन करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
         आपणांस सूचित करण्यात आनंद होत आहे की विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी  
या ब्लॉगची निर्मिती केली आहे. विशेषतः इ. 8 वी, 10 वी (विज्ञान विषय) तसेच इ. 11 वी व 12 वी (केवळ जीवशास्त्र) च्या English/ Semi English /Marathi Medium च्या विद्यार्थ्यांना ह्या ब्लॉगचा लाभ घेता येईल.

             सध्या केवळ इ. 10 वरच भर दिलेला आहे. परंतु काही दिवसातच इतर वर्गांच्या पोस्ट ब्लॉगवर upload करण्यात येतील. SSC बोर्ड तसेच CBSE बोर्डाचे विद्यार्थी या ब्लॉगचा वापर करू शकतील.

           या ब्लॉगवर सध्या इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाचे 12 projects (उपक्रम), विज्ञान भाग 1 व 2 च्या प्रत्येक प्रकरणावर 20 गुणांची एक चाचणी (class test) अश्या एकूण 40 चाचण्या, मार्च 2020 ची विज्ञानाची बोर्डाची प्रश्नपत्रिका, तसेच विज्ञान विषय चांगला आत्मसात करण्यासाठी काही सूचना (tips) आणि माझ्या youtube चॅनलची लिंक दिली आहे. हे सर्व घटक आपण वाचूही शकता किंवा pdf स्वरूपात download सुद्धा करू शकता ते ही अगदी मोफत (Free of cost).

         विद्यार्थ्यांना ब्लॉग वापरणे सोपे जावे यासाठी ब्लॉगचे ठळकपणे दिसतील असे "English Medium" (ब्लॉगचा उजवा भाग) व "मराठी माध्यम" (ब्लॉगचा डावा भाग) असे दोन भाग केले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा यासाठी "Search in Tarangan"  किंवा "या ब्लॉगवर शोधा" असे  OPTIONS सुध्दा दिले आहेत. या OPTIONS मध्ये विद्यार्थ्यांनी नुसते पाठाचे नाव जरी टाकले (मराठी/इंग्रजी दोन्हीही भाषेतून चालेल) तरी त्यांना त्या पाठाच्या सर्व पोस्ट एकत्रित पाहायला मिळतील.
            याशिवाय ब्लॉग वर वैज्ञानिक दिनविशेष सुद्धा पोस्ट करण्याचा माझा प्रयत्न असेल. हा दिनविशेष तुम्हाला सर्वात वरच्या बाजूला अगदी ठळकपणे ब्लिंक होताना पाहावयास मिळेल. त्याचबरोबर वैज्ञानिकांचे विज्ञान विषयात अमूल्य योगदान / कार्य, त्यांना आलेल्या अडचणी, त्या अडचणीवर त्यांनी केलेली मात,  त्यांनी लावलेले शोध, या वैज्ञानिकांचे प्रोत्साहनपर संदेश, विज्ञान कथा,  इ. तुमच्या पर्यन्त पोहोचवण्याचा कयास असेल.

        तरी आपणां सर्वांना विनंती आहे की विज्ञानाच्या या ब्लॉगला भेट द्यावी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या ब्लॉग पोहोचण्यासाठी सहकार्य लाभावे. हा ब्लॉग तसेच ब्लॉगवरील माहिती आवडल्यास तसेच ब्लॉगवरील नवीन पोस्टचे notification वेळोवेळी  मिळण्यासाठी नक्की ब्लॉगला follow करा. मी आपल्या मौल्यवान सूचनांची वाट पाहत आहे.

Tarangan is the best hub for science seekers. This blog is specially organized to fulfill all the requirements which are related to Science subject.

Science is the subject of experiments. This blog is fully stuffed with the videos, notes , practicals of important topics and difficult concepts. It is also stuffed with Chapter wise quizzes, class tests, question banks and activities for evaluation purposes.

High school students as well as those students appearing for competitive examinations can enjoy the content of this blog.

 

So, Happy surfing!!!

 

विज्ञान सेवक,

डॉ. पांडुरंग विश्वंभर दरेकर 
            (M. Sc., B.Ed., Ph.D.)


3 comments:

  1. खूप छान. 👌👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. Dr pandurang..... good activity for better of students in pendamic corona.keep doing in future also.....all the best
    shri jayram bhide
    Vice Principal
    Dayanand college arts and science
    Solapur

    ReplyDelete
  3. Sir thanks to give a lot of such a good study materials.

    ReplyDelete