
नमस्कार सर्व यशस्वी विद्यार्थी मित्रांनो,
.... दोस्तो, जिंदगी जल्द ही फिर एक बार मुस्कारायेगी ... आप को बस तंदुरुस्त रेहना है...
जरी लॉक डाऊन शिथिल झाले असले तरी काळजी घेणे आपले सर्वात पहिले कर्तव्य आहे... Take care, Be safe ! ! !
1 ऑगस्ट पासून 11 वी ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे...
तुमच्यापैकी काहीजण इंजिनिअरिंगचा डिप्लोमा, काही विद्यार्थी सायन्स, काही कॉमर्स तर काहीजण आर्टस्ला ही जाण्याचा विचार करीत असतील.
काही ITI, MCVC, किंवा डिझेल मेकॅनिक वगैरे असा ही पर्यायांचा विचार करत असतील. एक ठराविक वर्ग असाही असेल की.... दोन - चार महिने कॉलेज ला जायची क्रेज अनुभवायची ..... आणि मग जायचं आपलं कामाला.... कुठंतरी.
मित्रांनो, लक्षात घ्या की येणारे काही दिवस आपल्या आयुष्याला एक दिशा देणारे असतील.... समजा तुम्ही पुणे हायवे ने कुठंतरी निघालात तर अर्धा प्रवास करून... अचानकपणे, मला हैद्राबाद ला जायचं होतं मी चुकून इकडे आलो असं म्हणालात... तर विचार करा की त्याला काही अर्थ असेल का?
सर्वात प्रथम तुमची आवड ओळखा की मला भविष्यात काय व्हायचंय...? कोणते काम / कार्य, मी आयुष्यभर आनंदाने करू शकतो? मला कोणत्या कार्यात जास्त रस आहे? ..... आणि मग त्या दिशेने वाटचाल करायला लागा... हळूहळू एक दिवस नक्कीच आपला असेल.
तुम्हाला एक सोपा उपाय सांगू का ? जर समजा तुम्ही एका जंगलात हरवला आहात... आणि तुम्हाला, कोठून बाहेर पडायचं कळत नाही... तुम्ही काय कराल? नक्कीच तुम्ही एका उंच ठिकाणी थांबाल, योग्य दिशा ओळखाल... आणि मग हसत हसत योग्य ठिकाणी पोहोचाल.....
अगदी तस्सच !!! जर आता तुम्हाला आपण पुढे जाऊन कोण होणार हे उमगत नसेल तर एक काम करा... 11 वी ला ऍडमिशन घ्या 12 वी पर्यंतची एक ठाम अशी उंची प्राप्त करा.... येणाऱ्या दोन वर्षांचा अनुभव, शिक्षण, मित्रांचा सल्ला, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तुमच्या बुद्धिमतीचा कल ओळखा... आणि मग...
मग तुम्ही
आर्टस् शाखेत प्रवेश घेऊन BA करून mpsc, upsc देऊ शकता,
किंवा कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊन CA होऊ शकता...
किंवा सायन्स शाखेत राहून BSc, MSc करू शकता
किंवा इंजिनीअरिंग ला जाऊ शकता
किंवा मेडिकल, डी फार्मसि जॉईन करू शकता..
किंवा
12 वी नंतर एक परिपक्व विद्यार्थी म्हणून स्वतःचा व्यवसाय ही करू शकता.
म्हणून किमान 12 वी पर्यंतचे शिक्षण तरी पूर्ण कराच.
बऱ्याच घरी कदाचित असं चित्र असते की.... शेजारच्या / समोरच्या घरात एक मुलगा कॉम्प्युटर इंजिनीअर झाला, आता तो बेंगलोर ला 60 हजार कमावतो आहे.... तूही कॉम्प्युटर इंजिनीअरच हो.... अहो आई, बाबा, काका, ताई.... विद्यार्थ्यांचा बिझनेस मध्ये इंटरेस्ट आहे... तर त्याला BBA, MBA होऊ दया... कदाचित त्याच्या मध्येच उद्याचा अंबानी, बिर्ला, टाटा दडला असेल...
काही विद्यार्थ्यांचं मत असतं... सायन्स खूप अवघड असतं... पण खूप कमी लोकांना माहित असतं की सायन्स मध्ये बुद्धीला चालना मिळते, कष्ट करायची सवय लागते, विद्यार्थ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होतो ..... आणि वर्षभर अभ्यास करून पास व्हायला 15 -16 मार्कच लागतात.... कारण 20 मार्क्स तर प्रॅक्टिकलचे असतात... आता तुम्हीच ठरवा काय करायचं....
सारांश इतकाच की.... पुढचा प्रवास सोपा करण्यासाठी कोणत्या एस टी मध्ये बसायचं आणि कोणत्या गावाला पोहोचायचं हे ठरवायचे हे काहीच दिवस !!!
जर समजा तुम्ही 11 वी सायन्स ला गेलात तर पुढे दोन पर्याय आहेत.
मेडिकल लाईन ( BAMS, BHMS, BDS, MBBS, D. Pharmacy, B. Pharmacy, Nursing वगैरे ).... तर तुम्हाला 11 वी आणि 12 वी दोन्ही वर्षाला Biology हा विषय पाहिजेच.
जर तुम्ही इंजिनिअरिंग लाईन ला, (Diploma, Degree, Mechanical, civil, electronics or conputer )... तर तुम्हाला Mathematics हा विषय 11 वी आणि 12 वी ला पाहिजेच.
पण जर डॉक्टर व्हायचं असेल तर Mathematics नसले तरी चालते
आणि
इंजिनिअर होणार असलं तर Biology हा विषय नसला तरी चालतंय...
चला तर आता ऐका विषय कोणते कोणते आहेत?
एक विषय compulsory : English
खालीलपैकी एक निवडा
मराठी किंवा हिंदी
आतां महत्वाचे : खालीलपैकी कोणतेही चार निवडा.
Physics भौतिकशास्त्र
Chemistry रसायनशास्त्र
Mathematics गणित
Biology जीवशात्र
Geology भूगर्भशास्त्र
माझा सल्ला :
सध्या कोणत्या दिशेने जाणार हे ठरत नसेल, म्हणजे डॉक्टर व्हायचं का इंजिनिअर हे fix नसेल तर Mathematics आणि Biology दोन्ही विषय ठेवावे.
एकूण वर्षभरात शिकावयचे विषय 6
Wish you all the best.. 👍🏻👍🏻
Dr. R. V. Darekar
Head Dept of ENTC,
AGPIT, Solapur
👌👌👌🙏🙏🙏
ReplyDelete